तेर / प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व पोषण याचा दर्जा उंचावण्यासाठी माझी पोषण परसबाग विकसन मोहीम राबवण्यात येत असून याला उस्मानाबाद तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 15 जून पासून सुरू झालेल्या या मोहिमेत 987 कुटुंबांमध्ये पोषण परसबागा तयार करण्यात आले आहेत. सदर मोहीम राबवणे मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद तालुका प्रथम क्रमांकावर आहे,अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक पूजा घोगरे यांनी दिली.

 पोषण परसबागेच्या माध्यमातून घरातील गर्भवती स्तनदा,किशोरी,लहान मुले यांचे आरोग्य सुधारण्यासाठी लक्षणीय मदत होणार असून रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी पिकवलेला भाजीपाला उपयोगी पडू शकतो.  या माध्यमातून कुटुंबाचा उत्तम प्रकारे विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियाना मार्फत 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग महाराष्ट्रभरात सुरू करण्यात आलेले आहे.

 उस्मानाबाद तालुक्यातील सीटीसी,उद्योग सखी,एम सी आरपी, कृषी सखी व सीआरपी, बँक सखी, कृषी व्यवस्थापक, पशुधन व्यवस्थापक यांच्या माध्यमातून गाव पातळीवर पोषण परसबाग निर्मिती जोरात सुरू आहे. सदरहू मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका व्यवस्थापक  अभिजीत पडवळ, रेश्मा मोरे ,राहुल मोहरे ,नागेश काकडे व  प्रभाग समन्वयक  राम अंकुलगे तेर,अमोल खवले बेंबळी,अमर सूर्यवंशी पळसप ,रमेश कुंभारे कोंड, गिरीश तीर्थेकर ढोकी ,स्वाती दाने उपळा, दिपाली शिंदे सांजा ,संध्या मुळे पडोळी ,संतोष गवळी आंबेजवळगे, श्रीराम भोसले वडगाव हे प्रभाग स्तरावर परिश्रम घेत आहेत.

 
Top