उस्मानाबाद / प्रतिनिधी

कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध, सार्वजनिक स्थळी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर  ठेवण्यास आदेशित केलेले आहे. या मनाई आदेशांचे उल्लंघन करणा-या सहा आरोपींना तसेच सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहन उभे करणा-या एका आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आज दिनांक 09 जुलै रोजी पुढील प्रमाणे आर्थीक  दंडाच्या  शिक्षा सुनावल्या आहेत.

  मनाई आदेशांचे उल्लंघन करुन येडशी येथे दुकाने व्यवसायास चालु ठेवुन भादसं कलम 188,269 चे उल्लंघन केल्या बददल  समाधान सुभाष पाटील, रामेश्वर उत्रेश्वर माळी, अनिल नानासाहेब नलावडे या तिघांना प्रत्येकी 1,000 रुपये दंडाची शिक्षा तर शिराढोण येथे  दुकाने व्यवसायास चालु ठेवुन भादसं कलम 188,269 चे उल्लंघन केल्या बददल  जिलानी कुरेशी, शब्बीर अत्तार, फिरोज अत्तार या तिघांना प्रत्येकी 500  रुपये दंडाची शिक्षा  तसेच उमरगा येथील  सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहन  उभे करुन भादसं कलम 283  चे उल्लंघन करणा-या  राहुल सरवदे यांना 200 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


 
Top