परंडा / प्रतिनिधी :-

परंडा तालूक्यातील खासगाव येथील स्मशानभुमी व गावठाण च्या जागेत अतिक्रमन धारकाला पाठीशी घालुन पदाचा दुरुपयोग करणाऱ्या  परंडा पंचायत समीतीचे   गटविकास अधिकारी यांची चौकशी करून निलंबीत करावे अन्यथा एकल महिला संघटणेच्या वतीने अंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.८ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खासगाव येथील स्मशानभुमी व गावठाण च्या जागेत तत्कालीन सरपंच , ग्रामसेवक यांनी संगणमत करून नितिन लिमकर व महादेव लिमकर यांच्या नावावर बोगस नोंद घेतली आहे .

या बोगस नोंदीच्या अधारे नितीन व महादेव लिमकर यांनी ५ गुंठे जागेवर अतिक्रमन केल्याने त्यांच्या विरुद्ध गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्या कडे ले दि.१७ जुन रोजी लेखी तक्रार देऊन अतिक्रमन काढण्याची मागणी केली होती.

मात्र १० दिवसा नंतरही अतिक्रमन काढण्याची कारवाई झाली नसल्याने दि.२८ जुन रोजी तहसिल कार्यालया समोर एकल महिला संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले मात्र गट विकास आधिकारी अंधारे यांनी दखल घेतली नाही .

गटविकास आधिकारी व आतिक्रमन धारकात आर्थीक व्यावहार झाल्याची शक्यता असल्याचा आरोप करीत  गटविकास आधिकारी हे अतिक्रमन धारकास पाठीशी घालत असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस नोंदची व गट विकास आधिकारी यांची चौकशी करून निलंबीत करून अतिक्रमन काढण्यात यावे अन्यथा तिव्र अंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर सुशिला बबन लिमकर उप सरपंच ,मंदा देवीदास पाटील ता.अध्यक्षा एकल महिला संघटणा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top