उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आरक्षण मुक्त भारत हे आरएसएसचा आजेंडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे असले तरी  आरएसएसच्या दबावाखाली काम करीत असल्यामुळे देशातील ओबीसींचे आरक्षण गेले, अशी घणाघाती टिका काँग्रेसच्या अोबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस भवनमध्ये ९ जुलै रोजी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने, पांडुरंग कुंभार, धनंजय राऊत, खलिल सय्यद, अिग्नवेश शिंदे, विश्वंभर मैंदाड आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना भाऊनुदास माळी यांनी काँग्रेसची पीछेहाट झाल्याचे मान्य करीत भाजवाल्यांनी ओबीसी , भटके, मुस्लिम, दलित लोकांत विषारी विचार पेरल्यामुळेच हे लोक काँग्रेसपासून बाजूला झाले होते. परंतू आता त्यांना वस्तूस्थिती समजली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा सर्व समाज एकत्रित करण्याची मोहिम सुरू केली आहे. केंद्र सरकारने इंम्पोरियल डाटा उपलब्ध करून न दिल्यामुळेच कोर्टाद्वारे ओबीसी आरक्षण भाजपने घालविले आहे. राज्यसरकार ने ओबोसी आयोग स्थापन करून डाटा तयार करण्याचे काम येत्या दोन दिवसात चालू होईल, असे माळी यांनी सांगितले. भाजप केंद्रात आल्यामुळे राष्ट्रीयकृत कंपन्यातील  ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे.

फुले-शाहु-आंबेडकरांचा विचार पायदळी

महाराष्ट्राची भूमि समाज सुधारक व पुरोगामी विचाराच्या फुले-शाहु-आंबेडकर यांची जन्म व कर्म भुमी आहे. वंचीत समाजाला आरक्षण देण्याचे काम फुले-शाहु-आंबेडकर यांनी केले. परंतु आरएसएसच्या दबावाखली काम करणाऱ्या भाजपा सरकारने आरक्षण मुक्त भारत हा छुपा अजेंडा घेऊन फुले-शाहु-आंबेडकरांचा विचार पायदळी तुडवले, अशी टिका भानुदास माळी यांनी केली. 

भाजपा मधील मोठा गट फुटणार

१५ नोंव्हेंबर पर्यंत इंम्पोरिअल डाटा कोर्टामध्ये सादर करून ओबीसींना राजकीय आरक्षण दिले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने नवी दिल्लीत जतंर-मतंरवर १ लाख लोक आंदोलन करतील तर जिल्हयात जेल भरो आंदोलन होईल, असे सांगून भानुदास माळी म्हणाले की, भाजपा मधील  मराठवाड्यातील मोठा गट फुटून काँग्रेस मध्ये येणार असल्याचे सांगितले. यावेळी माळी यांनी मराठा आरक्षणा संदर्भात लोकसभेत कायदा पास करून मराठा आरक्षण द्यावे व आरक्षण हे ७० टक्क्यापर्यंत वाढवावे, असेही मागणी केली. 


 
Top