उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक पूर आला होता. उस्मानाबाद तालुक्यातील बोरखेडा व समुद्रवाणी शिवारातील ओध्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. बोरखेडा ओढ्यातून कनगरा येथील युवक समीर युनूस शेख वाहून गेला होता. जिल्हा आपत्ती निवारण पथक, उस्मानाबाद अग्निशामक दल, जिल्हा पोलीस दल, तसेच ग्रामस्थांनी समीर याचा शोध शुक्रवारी रात्रीपासून सुरू केला होता. शनिवारी दिवसभर शोध घेतल्यानंतरही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी दुपारी 4 वाजता  शोधकार्य संपवण्यात आले. परंतु समीरच्या नातेवाईकांनी त्याचा सतत तपास सुरूच ठेवला. अखेर रविवारच्या पहाटे सहा वाजता दुर्दैवाने समीरचा मृतदेह आढळला. समीरच्या काकांना सुरुवातीला मृतदेह दिसून आला. 

तेरणा नदीच्या पात्रात खोलीकरण केलेल्या ठिकाणी मृतदेह अडकून पडला होता.  फुगून तो वर आल्यानंतर सर्वांना दिसून आला. बोरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ पाटील यांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले. तेथे मृतदेह वाहून पुढे सरकत होता सर्वांनी प्रयत्न करून मृतदेहाला काठावर आणले. घटनास्थळावरून मृतदेह सापडल्याची ठिकाण अर्धा किलोमीटर दूर आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल होत असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन केले जात आहे आहे. दरम्यान, कनगरा येथील उमदा युवक असलेला समीर असा अकाली जाण्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. समीरच्या प्रतीक्षेत त्याच्या कुटुंबियासह गावातील सर्वजण रात्रभर जागून होते.

दरम्यान समुद्रवाणी येथून तिघे जण वाहून गेले होते. यामध्ये कार मधून वाहून गेलेली दोघे लगेच पुरातून सुदैवाने बाहेर पडले. परंतु लासोना येथील रसाळ नावाचे गृहस्थ बेपत्ता आहेत. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. शासकीय यंत्रणांनी त्यांचाही शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत शोध घेतला होता.

 
Top