तुळजापूर / प्रतिनिधी - 

तालुक्यातील  जळकोट येथे शुक्रवार दिरोजी रात्री 7 झालेल्या  मुसळधार  पावसात घराची भिंत कोसळली माञ कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, जळकोट (ता. तुळजापूर) येथे शुक्रवार राञी प्रचंड  मुसळधार पडला. यात पांडूरंग   यादगौडा यांच्या राहत्या घराची दगडी भिंत   पडून जवळपास अंदाजे 40 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.  महसूल प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कुटूबप्रमुख पांडूरंग यादगौडा यांनी संबंधीत प्रशासनास केली आहे.

 

 
Top