तेर (प्रतिनिधी)

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आचार्य कुटुंबात पाचव्या  पिढीपासून  चालत आलेला श्रीमद् भागवत सप्ताहास १८ जुलै पासून प्रारंभ झाला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे बाळासाहेब आचार्य यांच्या कुटुंबात पाचव्या पिढी पासून श्रीमद् भागवत सप्ताह साजरा केला जातो. सप्ताहाचा प्रारंभ आषाढ शुद्ध नवमी पासून पौर्णिमा पर्यंत हा श्रीमद् भागवत सप्ताह चालतो. सकाळी संहिता वाचन, दुपारी अर्थ निरूपण, सायंकाळी आरती असा दिनक्रम असतो. अर्थनिरूपण ह. भ .प. बाळासाहेब आचार्य करतात.


 
Top