उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मेहता  इंजिनिअरींग  कंपनीच्या दुकानासमोरील रस्ता मोजून अतिक्रमीत रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते मेहता इंजिनिअरींग कंपनी मधील रस्ता मोजून अतिक्रमण काढण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी यांना ३० जून रोजी केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा अधीक्षक भूिमअभिलेख उस्मानाबाद यांना  रस्ता मोजून हद्द कायम करावी व प्रकरण निकाली काढण्याबाबत सूचना केली होती. जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख यांनी या संदर्भात दखल घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना देखील रस्त्याची हद्द कायम करण्यासाठी तारीख दिली गेली नाही, यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन भूमिअभिलेख विभागास आदेश द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी बाबासाहेब जानराव, विजय बनसोडे, बाबासाहेब कांबळे, उमाजी गायकवाड, प्रदिप कांबळे, राज माळाळे, कैलास शिंदे, सुनिल मनाळे आदींची उपस्थिती होती. 

 
Top