उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादसह कळंब, वाशी व लोहारा तालुक्यातील नागरिकांच्या तसेच विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून एमएच २५ हेल्पिंग हँड या सामाजिक संघटनेने जीवनावश्यक साहित्य संकलित करून साहित्याच्या कीट महाड तसेच चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त गावांना वाटप केल्या. शुक्रवारी सायंकाळी ही मदत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत पाठविण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी या टीमचे कौतुक केले.

 एमएच २५ हेल्पिंग हँड टीमच्या वतीने आठवडाभरापूर्वी मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते.त्यासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला. साखर, तेल, डाळी, पोहे, साबण, सॅनिटरी पॅड आदी जीवनावश्यक साहीत्याच्या सुमारे २ हजाराहून अधिक कीट तयार करण्यात आल्या. ही मदत उस्मानाबादसह कळंब, वाशी,लोहारा तालुक्यातून संकलित करण्यात आली होती. आयशर टेम्पोतून ही मदत 30 जुलै रोजी पाठविण्यात आली. कळंब तालुक्यात उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ,डॉ.अशोक मोहेकर, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक अतुल गायकवाड,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांच्या हस्ते या वाहनाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उस्मानाबादेत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर , अशिश पाटील जि. सचिव संभाजी ब्रिगेड आदींच्या उपस्थितीत साहित्य रवाना करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, तरुणांनी संकटकाळात सदैव मदतीच्या भावनेतून कार्य उभे केल्यास जनतेला मोठा धीर मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीत उतरविणे आवश्यक आहे. ते कार्य या टीमकडून होताना दिसत आहे. सायंकाळी तरुणांची ही टीम महाड,चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये रवाना झाली. शनिवारी दिवसभरात ही महाड व चिपळूण तालुक्यात शिलेदार अॅडव्हेंचर इंडिया या टीमच्या माध्यमातून ही मदत वाटप करण्यात आली .कोरेाना काळातही टीमने रूग्णांसाठी मोठे मदतकार्य उभारले होेते.

 
Top