उस्मानाबाद/ प्रतिनिधी

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस ची प्रचंड दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेची अक्षरशः लूट करीत आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा  प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. 

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर मराठवाडा प्रभारी शिवाजीराव मोघे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, उपाध्यक्ष दिलीप भालेराव, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला काँग्रेसच्या डॉ.स्मिता शहापुरकर, मुरुमच्या नगराध्यक्ष अनिताताई अंबर, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर उपस्थित होते.

पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, देशात महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी ने उच्चांक गाठला आहे. कोरोना काळात लोकांची मोठ्याप्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झालेली आहे. पण केंद्र सरकार व भाजप केवळ राजकारण करण्यात मग्न आहे.

बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, भागवतराव धस, विजयकुमार सोनवणे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, सुरेंद्र पाटील, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, प्रकाश चव्हाण, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, आप्पासाहेब शेळके, परंडा तालुकाध्यक्ष हणमंत वाघमोडे, भूम तालुकाध्यक्ष रूपेशकुमार शेंडगे, वाशी तालुकाध्यक्ष राजेश शिंदे, महिला सरचिटणीस स्नेहल स्वामी, सेवा दलाचे प्रणित डिकले, डी.एम.झाडबुके, अजय खरसडे, भूमचे नगरसेवक रोहन जाधव, संजय घोगरे, असंघटीत कामगारचे देवानंद येडके, किसान काँग्रेसचे गौरीशंकर मुळे, प्रसन्न कथले, अवधूत क्षीरसागर, विधी विभागाचे विश्वजित शिंदे, अतुल देशमुख, राहुल लोखंडे, विद्यार्थी काँग्रेसचे सौरव गायकवाड, सुधीर अलकुंटे, अविदाबाई चव्हाण, गणपती कांबळे, संजय गजधने, प्रेम सपकाळ, कफिल सय्यद, नियामत मोमीन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत उस्मानाबाद येथील न्यू भारतीय सेनेचे अध्यक्ष प्रभाकर लोंढे व लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हातील पक्षाच्या विविध कामाचा आढावा घेण्यात आला.

 मराठवाड्यात पक्ष वाढीला चांगले वातावरण- शिवाजीराव मोघे 

  मराठवाड्यात काँग्रेस पक्ष वाढीला सध्या अनुकूल वातावरण आहे. भाजपने लोकांना भावनिक करून, खोटी आश्वासने देऊन फसविले असल्याची भावना लोकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने लोकांचे प्रश्न घेऊन वेळोवेळी रस्त्यावर उतरावे, अशा सचूना या बैठकीत मार्गदर्शन करताना मराठवाडा निरीक्षक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिल्या. 

लोकांसाठी संघर्ष करणे ही काँग्रेसची शिकवण- मधुकरराव चव्हाण

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता संघर्ष केला. देश उभारणीसाठी संघर्ष केला. लोकांसाठी संघर्ष करणे ही काँग्रेसची शिकवण आहे, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लोकांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरुद्ध काँग्रेस संघर्ष करीत राहील,असे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आपल्या मनोगतात म्हणाले.


 
Top