उस्मानाबाद/ प्रतिनिधी

साहित्यिक बालाजी मदन इंगळे यांच्या ‘या परावलंबी दिवसात’  या काव्यसंग्रहास प्रथम क्रमांक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबादच्या वतीने दिनांक ९जुलै२०२१ रोजी उस्मानाबाद येथे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

 मराठी वाङमय परिषद बडोदे(गुजरात) च्या वतीने अखिल भारतीय स्तरावर काव्यसर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत बालाजी मदन इंगळे ,उमरगा यांना  प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबादचे अध्यक्ष नितीन तावडे,सचिव माधव इंगळे,कोषाध्यक्ष बालाजी तांबे, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र अत्रे, भा.न. शेळके, राम ढेरे, कालिदास म्हेत्रे आदींनी सत्कार केला.

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ९० वर्षापूर्वी मराठी वाङमय परिषद बडोदे (गुजरात) ची स्थापना केली. बालाजी इंगळे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङमनिर्मिती पुरस्कारासह इतर मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जाहीर झालेला पुरस्कार जिल्ह्यासाठी आनंददायी व अभिमानास्पद आहे. असे मसाप अध्यक्ष तावडे यांनी यावेळी सांगितले.

 
Top