लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा नगरपंचायतच्या रोजंदार सफाई कामगरांच्या पगारात निम्म्याने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त सफाई कामगारांनी दि.10 जुलै रोजी शहरातील शिवाजी चौकात आंदोलन केले. कामगार आक्रमक झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षे केल्याने वातावरण निवळले. 

दरम्यान माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसंदर, अभिमान खराडे, श्याम नारायणकर, श्रीकांत भरारे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, संस्थेचे संचालक चव्हाण व सफाई कामगार यांच्यात बैठक झाली. सफाई कामगारांच्या कामाचे तास कमी करून प्रतिदिन 160 रूपये पगार देण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 
Top