उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हयातील मंदिरे तातडीने खुली करा तसेच मंदिराचे पुजारी गुरव यांना विशेष आर्थिक मदत करून फ्रंट लाईन योध्यात समावेश करा व त्यांचे लसीकरण ही करण्यात यावे, अशी दणदणीत मागणी अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दि. १९ जुलै रोजी करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे की, सरकार ने इतर सर्व गोष्टींवरील निर्बंध हटविले आहे. परंतू हिंदु धर्मांचे श्रध्दास्थान असलेले मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत, यामुळे पुजारी गुरव समाजाची उपासमार होत आहे. त्यामुळे मंदिरे खुली करून पुजाऱ्यांना विशेष पॅकेज द्या, त्यांचे लवकरात लवकर लसीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाळराव नळेगांवकर, युवक मराठवाडा अध्यक्ष अजित मोकाशे,युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष नागनाथ बोरगावे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती लाखे आदी  उपस्थित होते.  


 
Top