उस्मानाबाद / प्रतिनीधी 

उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामिण पोलीस ठाण्याच्या हद्दितील  एका गावात आज रविवार दि.१८ जुलै रोजी दु. २ वाजता बालविवाह होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली  होती.

त्यानंतर तात्काळ ग्रामिण पोलीस ठाण्याचे  पोलीस निरिक्षक   सुरवसे यांच्या  मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले  पथकाने त्या  ठिकाणी जावून बालविवाह कायद्या बाबत मुलीकडील व मुलाकडील  नातेवाईकांना, वडील , आई, भाऊ, तसेच उपस्थितीत वह्राडी मंडळींना कायद्याचे  समुपदेशन केले व त्यांना बाल विवाह करण्या पासून रोखण्यात आले.  तसेच त्याचा जबाब व त्यांना समजही देण्यात आली.

यावेळी पोलीस उप निरिक्षक हिना  शेख , खंदारे , माचेवड, खोसे,  चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top