उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कळंब विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.कैलास घाडगे पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत आज निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, प्रवक्ते प्राचार्य जगदीश गवळी, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कवडे,जलमंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित काळे, छञपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इम्रान मिर्झा, संभाजी ब्रिगेडचे कळंब तालुकाध्यक्ष बालाजी नाईकनवरे, शहराध्यक्ष राहुल चोंदे,शहर उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड, शिवश्री जनक कदम, शिवश्री विशाल भोरे, जिल्हा संघटक शिवश्री विकास गडकर पाटील उस्मानाबाद नगर पालिकेचे सदस्य सोमनाथ गुरव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार कैलास घाडगे पाटील यांनी याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या निवेदनातील मागण्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठामपणे मांडण्याची हमी दिली. मराठा युवकांच्या नौकरीस पात्र अशा २१८५ उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या कायम करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे जोरदार मागणी लावून धरण्याचे देखिल कबूल केले.

याप्रंगी मराठ्यांचे आरक्षण आणि ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण याबाबत ठोस निर्णय नाही घेतला तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करेल आणि त्याच्या होणाऱ्या गंभीर परिणामास राज्यातील विधानसभेचे २८८ व विधान परीषदेतील ७८ आमदार जबाबदार राहतील असा देण्यात आला.

 
Top