उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद ब्राह्मण सेवा संघ या सेवाभावी व समाजसेवी संस्थेमार्फत कोराना या महामारीमुळे संक्रमित झालेल्या व उद्योग व्यवसाय बंद झालेल्या २१ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे धान्य वाटप करण्यात आले. 

गेल्या वर्षी हाच उपक्रम या संस्थेने हाती घेतला होता. धान्य दुकानात गर्दी होवू नये व कोरोना महामारीचा धोका टळावा या दृष्टीने संस्थेतर्फे स्वतंत्र रिक्षा करून माल घरपोच करण्यात आला व या वाटपासाठी कोरोना नियमाचे पालन करण्यात आले. या धान्य वाटपासाठी प.पू.शरदभाऊ जोशी (पीठाधीश, गुणवणी महाराज आश्रम, कोथरुड पुणे), अजित नाईक-पंढरपूरकर (सराफी दुकानदार, तुळजापूर), मुख्य विश्‍वस्त महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विलेपार्ले मुंबई, विनायकरावजी चिवटे(कर्वे नगर, पुणे), श्रीराममहादेव ओक(मालाड, मुंबई), अध्यक्ष, ब्राह्मण सभा मांलाड, मुंबई, ऍड.पद्माकरराव डोंगरे(कर सल्लागर, पेण, जि.रायगड) यांनी आर्थिक सहकार्य केले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक शं.कुलकर्णी (बेंबळीकर) यांनी आभार व्यक्त केले आहेत.

या वाटपासाठी मे.किरकसे धान्य दुकान, नेहरू चौक उस्मानाबाद यांनी विशेष मदत केलेली आहे. अत्यंत अडचणीत जीवनावश्यक धान्याचा पुरवठा केल्यामुळे लाभधारकांतून आनंद व्यक्त होत आहे.

 
Top