उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  नळदुर्ग येथील राष्ट्र सेवादल संचलित आपलं घर प्रकल्प   संस्थेच्या संपूर्ण  परिसरात आतापर्यंत  2000 झाडे लावून संगोपन केले आहेत .  यावर्षी त्यात 1000 झाडांची लागवड करण्यासाठी  3 व 4 जुलै रोजी दोन दिवसाची श्रमछावणी शिबीर घेण्यात येत आहे.या वृक्षारोपण छावणीचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे आणि बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अश्रुबा कदम व  नंदकिशोर कोळगे  यांच्या हस्ते आणि  या संस्थेचे संस्थापक पन्नालाल सुराणा यांच्या  उपस्थितीत उत्साही वातावरणात झाले.

या वृक्षलागवड श्रमछावणी शिबिरात भोसगा, येणेगूर, भूम येथून  श्रीमती लता बंडगर  तसेच कोल्हापूर, इचलकरंजी, हेरवाड ,मिरज येथील श्री.  सदाभाऊ मगदूम,श्री बाबा नदाफ हे  सेवा दल कार्यकर्त्यांसह सहभागी झाले आहेत .  संस्थेच्या संपूर्ण विस्तीर्ण डोंगर परिसरात दोन दिवस पर्यावरण विषयावर चर्चा, गाणी, गप्पा करत एक हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे . उद्या 4 जुलै रोजी  सायंकाळी या कार्यक्रमाचा समारोप होईल.

या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते , प्राथमिक , माध्यमिक  विदयालयाचे शिक्षक यांच्यासह  दयानंद काळुंके, सुभाष वैरागकर व सहकारी वृत्रक्षप्रेमी मित्रांनी सहभागी होऊन आनंद व्यक्त केला. उदघाटन सत्राच्या या कार्यक्रमात आपलं घर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्भय कोरे ,पदाधिकारी सरिता उपासे, सुधीर खाडे ,गुंडू पवार, निजगुण स्वामी,अँड.अजय वाघाळे उपस्थित होते. प्रकल्प व्यवस्थापक विलास वकील यांनी सर्वांचे स्वागत केले. दोन दिवशीय वृक्षलागवड छावणीचे संचलन अधीक्षक संदीप चवले ,मुख्याध्यापक  श्रीमती संगीता शहा, अनिल धामशेटी व शिक्षकवृंद करत आहेत.

 
Top