उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात तालुका व जिल्हा न्यायालयात रविवारी (दि. १) राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी पक्षकार व विधिज्ञांना कामकाजासाठी जॉबवर्क आणि झेरॉक्स दुकानाची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे रविवारी ती सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या परिसरातील जॉबवर्क व झेरॉक्सची दुकाने कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या अटीवर चालू ठेवण्यास सूट देण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी कळविले आहे.


 
Top