उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 कामगार कल्याण मंडळाअंतर्गत शहरामध्ये इमारत असुन त्यामध्ये अनेक सोयीसुविधा आहेत, पण त्या इमारतीला आता तडे गेल्याने नव्याने इमारत बांधण्याची गरज असल्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यानी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव द्या लवकरच त्याला मंजुरी मिळेल असे आश्वासन दिल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाअंतर्गत येणाऱ्या ललीत भवन येथील जुनी इमारत निकामी झाल्याची बाब समोर आली होती. त्याबाबत त्या भागातील जनतेतुन येथे नव्याने सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याची दखल घेऊन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यानी 29 जुलै रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये बैठक आयोजीत केली होती. त्या विषयावर सविस्तर चर्चा झाली  कामगार कल्याण विभाग कडून नवीन इमारतीचा प्रस्ताव मागवून शासनाला पाठवण्याचे निर्देश  देण्यात आले, त्याला दोन टप्यात मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले आहेत.या बैठकीला कामगार विभागाच्या सचिव विनिता सिंघल, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यालय असुन ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.कामगार कल्याण मंडळाच्यावतीने अनेक कामगारासाठी व त्यांच्या मुलांसाठी यामध्ये उपक्रम राबविण्यात येतात. मात्र या इमारतीला तडे गेले असुन संपुर्ण हॉल, शिशुमंदीर, व्यायामशाळा, कार्यालय, संरक्षण भिंत यांना तडे गेल्याने याठिकाणी कामकाज करणे कठिण झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या खुल्या जागेमध्ये नवीन इमारत बांधण्यासाठी कल्याण आयुक्त यांना आदेश देण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी विषय मार्गी लावण्याचा शब्द दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले

 
Top