तुळजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील एका २६ वर्षीय तरुणाचा तुळजापूर शहरातील गजबलेलया चौकात भर दिवसा धारदार शस्त्राने खून केल्यानंतर पोबारा केलेल्या आरोपीला २४ तासात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, अनैतिक सबंधांतून खून केल्याची आरोपीने कबुली दिल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.


काक्रंबा येथील शंकर दाजी गायकवाड तुळजापूर शहरातील लातुर रस्ता चौकात असलेल्या शासकीय अन्नधान्य गोदामामध्ये बुधवारी बसले होते. अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने पोटात व छातीवर वार करून गंभीररित्या जखमी केले. जखमी अवस्थेत गायकवाड जीव वाचविण्यासाठी गोदामाच्या बाहेर येवून आरडाओरडा करताच घटना स्थळावरून आरोपीने पळ काढला. गायकवाड यांना पोलिस व काही तरुणांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मूत्यू झाला. तुळजापूर पोलिसांनी आरोपीच्या शोधात तपासाची चक्रे फिरवत दोन पथके रवाना केली होती. पोलिसांच्या याच पथकाने कोंड शिवारातून आरोपी सूरज दिपक शिंदे याला अटक केली. या आरोपी विरुद्ध मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top