उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभियान अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या प्रामुख्याने अन्न प्रक्रिया वस्तू ,विणकाम ,शेतीला लागणाऱ्या औषधी एकाच ठिकाणी मिळावे,यासाठी सुप्रभात महिला प्रभागसंघने मार्केटींग आऊटलेट मॉल  पारा येथे चालू केला आहे. त्याचे उदघाटन  नुकतेच करण्यात आले. 

 यावेळी पंचायत समिती सभापती रुपालीताई घोलप,माजी उपसभापती विष्णू मुरकुटे,  पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खिलारे,पारा गांवचे सरपंच राजेंद्र काशीद,तालुका अभियान व्यवस्थापक वैशाली गायकवाड,तालुका व्यवस्थपक अर्चना गडदे, प्रभाग समनवयक अशोक बांगर आदी उपस्थित होते.प्रभाग संघ अध्यक्ष कविता लगाडे,कोषअध्यक्ष मंदाकिनी गोरख मुढे,नवदीप ग्रामसंघाच्या अध्यक्ष मीना सुंदर माळी  ज्या ताई  मॉल चे काम पहाणार आहेत त्या दीक्षा गवळी तसेच उपस्थित  प्रभाग मधील स्वाती खराडे,सारिका भुसारे,सिधुताई कांबळे,मीना शिदें,उषा काकडे,सोनाली उघडे, अलका शिंदे, सुरेखा दराडे,अनुराधा माळी, कविता जगताप,नीता मोरे,मंगल गाडे, शारदा तांबडे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

 
Top