उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

आलमला (ता.औसा जि.लातूर) येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदवीका महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धा परिक्षेत उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कुलचा विद्यार्थी पृथ्वीराज सुभाष कदम-पाटील याने यश मिळवले आहे. १५१९ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. त्यामध्ये पृथ्वीराज ने द्वितीय क्रमाक पटविकला आहे.

प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली  विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदवीका महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्पर्धा परिक्षा घेतली जाते. यावर्षी सदरील परिक्षा कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या परिक्षेत पृथ्वीराज कदम-पाटील याने द्वितीय क्रमांक मिळवून रोख ७ हजार ७७७ रुपये, सन्मानपत्र तसेच ६० हजार रुपये महाविद्यालयीन शिष्यवृत्तींचा मानकरी ठरला आहे. या यशाबद्दल तेरणा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष एल.एल.पाटील, सचिव अनंतराव उंबरे, प्राचार्य विलास मोरे, प्रा. शंकर गिरी, प्रा.अंकुश बिडवे तसेच शिक्षकवृंद व पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हानमंत देवकते, सचिव धनंजय गुंड-पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे-पाटील आदींनी अभिनंदन केले. 


 
Top