लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे कृषी विभग यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी किसान गोष्टी व खरीप हंगाम पीक संरक्षणासाठी रोग व कीड व्यवस्थापन चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला.दरम्यान पीक स्पर्धेमध्ये रब्बी हंगाम ज्वारी चांगले उत्पन्न घेऊन तालुक्यातुन दुसरा क्रमांक महादेव जेवले व तिसरा क्रमांक संगाप्पा फुंडीपल्ले यांनी पटकावला. यावेळी त्यांचा सत्कार डॉ.श्रीकृष्ण झगडे शास्त्रज्ञ यांच्या हस्ते करण्यात आला. 

 यावेळी  तुळजापूर येथील डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी किसान गोष्टी व खरीप हंगाम पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खताचा जास्त वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आव्हान शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत करण्यात आले. यावेळी कृषि पर्वक्षेक रवी बनजगोळे, आत्मा बी टी एम कैलास पवार,  कृषी सहाय्यक सचिन पवार, यांच्यासह प्रगतशील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top