नळदुर्ग / प्रतिनिधी-

 ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात गंभीर जखमी झालेल्या कामगार न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांचा गुरुवारी (ता. १६) रात्री दहा वाजता सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास जेवळी पूर्व तांडा फाट्यावर घडला. गुलाबराव हुलसुरे (वय ६३, रा. जेवळी) असे मृताचे नाव आहे.

 हुलसुरे हे निवृत्तीनंतर ते पूर्णवेळ शेती व्यवसाय करीत होते. गुरुवारी रात्री शेतीतील कामे आटपून कारने (एमएच २० डीव्ही ४७९१) ते जेवळी येथील घरी येत होते. दरम्यान, एका ट्रॅक्टरशी त्यांच्या कारची समोरा-समोर धडक झाली. अपघातानंतर कार पलटी होत बाजूच्या खड्ड्यात पडली. कारमधील हुलसुरे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते नुकतेच कोरोनातून बरे झाले होते.

 
Top