परंडा /प्रतिनिधी :- 

पोलिसांच्या वतीने बुधवार दि. ३० रोजी पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यात महारक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबीरात २९१ जणांनी रक्तदान केले.रक्तदात्यांना पोलिसांच्या वतीने हेल्मेट भेट देण्यात आले .कोरोना मुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याने परंडा पोलिस दल ,पोलिस पाटील  संघटना व ग्रामसुरक्षा दल यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

परंडा  येथील पत्रकार , शिक्षक , शेतकरी संघटना,कमांडो करिअर अकॅडमी च्या २७ व क्रांतीसंगर करिअर अकॅडमीच्या ११ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तर डोंजा येथील गणेश भाग्यवंत व सुषमा भाग्यवंत या शिक्षक दाम्पत्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक मोमीन, पोना हावळे , पोकॉ कवडे , पोकॉ शेख , महिला पोलिस नाईक मुल्ला , पोकॉ  शिंदे , पोना शिंदे , मनोज परांडकर, शेख यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .रक्तदात्यांना हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.रक्तसंकलन बार्शी येथील भगवंत रक्तपेढीचे कर्मचारी गणेश जगदाळे , अमोल नवले, विजय तोडकरी , प्रजक्ता क्षिरसागर ,अकांक्षा कदम , शबाना शेख यांनी रक्त संकलन केले .

 
Top