परंडा /प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयात बुधवार दि.३० जून रोजी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे प्रा.डी.व्ही. मांजरे आणि  कनिष्ठ विभागाचे प्रा.दत्ता मुळीक हे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभ प्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की महाविद्यालयातील कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्यासाठी हे महाविद्यालय सदैव उघडे असेल केवळ त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा दाखवावा त्यांना दिलेले काम जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे म्हटले.

      याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ,दीपा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे ,सत्कारमूर्ती प्रा.डी. व्ही.मांजरे आणि प्रा.दत्ता मुळीक हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परंडा शहरातील मोरे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.आनंद मोरे ,शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील डॉ. शिंदे  डी व्ही,मौजे रुई येथील सेवानिवृत्त शिक्षक लिमकर एन.व्ही.शहरातील मुन्ना ठाकूर,राजकुमार पाटील अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयातील कर्मचारी महेश पडवळ प्रा.किरण देशमुख ,प्रा.उत्तम कोकाटे, प्रा.दीपक हुके ,प्रा.माने बि.डी.,प्रा.संजीवन गायकवाड, एस.पी. महाविद्यालय भूम येथील डॉ.शिंदे डी व्ही, डॉ. आनंद मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली . 

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या वतीने प्रा.डी.व्ही.मांजरे आणि प्रा.दत्ता मुळीक यांचा शाल बुके मोमेंट देऊन  निरोप देण्यात आला. 

     प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की या महाविद्यालयातील  प्रत्येक कर्मचारी हा माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे प्राचार्य या नात्याने अनेक वेळा अनेक कर्मचाऱ्यांना बोलावे लागते त्याशिवाय कोणतेही काम पारदर्शकपणे होत नाही किंवा कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत नाहीत . शेवटी सत्कारमूर्ती प्रा.डी.व्ही.मांजरे आणि दत्ता मुळीक यांनी आपल्या संपूर्ण सेवेमध्ये असतानाचा  अनुभवाचा वृत्तांत  मांडला यावेळी संपूर्ण सभागृह भावनावंश झाले होते.कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.तर आभार प्रा.संभाजी धनवे यांनी मानले.

 
Top