तुळजापूर / प्रतिनिधी-  

एकेकाळी १०० एकराचा मालक असलेला मराठा समाज आज  भूमिहीन होवुन रेशन व आरक्षण रांगेत आल्याने मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे, असल्याचे प्रतिपादन आ. लक्षमण ढोबळे यांनी तुळजापूरात पञकारांशी बोलताना केले.

 आरक्षण बाबतीत बोलताना  ढोबळे पुढे म्हणाले की, देश स्वातंत्र्य होताच १९४७ ला सव्र्हे झाला. यावेळी ६६ टक्के मराठा समाजातील मंडळी जमिनीचे मालके होते. परंतु आज पाच पिढ्यात झालेल्या वाटणीमुळे तो ५ एकरावर येवुन अल्पभूधारक झाला. अल्पप्रमाणातील जमिन कसणे शक्य नसल्याने त्याने ती विकुन टाकली आज स्थितीत शेतात भाजीपाला पिकवाणारा मराठा समाज आज भाजीपाला विकत घेवुन तो विकुन  कुंटुंबाचा उदारनिर्वाह करीत असुन एकेकाळी १०० एकराचा मालक असलेला मराठा समाज आज रेशन आरक्षणच्या रांगेत आला आहे.

आज परिस्थिती दहा टक्के मराठा समाजातील मंडळी सक्षम आहेत.  ७० टक्के मराठा समाज बांधव आज रोजदारीवर कामाला जात असल्याने त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यांना आरक्षण द्यावे,आरक्षण ५० टक्केच्या वर न जाता सर्वाना द्यावे, आज आरक्षणासाठी विविध जातीधर्मात अशांतता संघर्ष भाषा येत आहे. यासाठी नियोजनबध्द पध्दतीने सर्वांना आरक्षण दिले तर संघर्षाचे वातावरण निवळुन शांततेचे वातावरण निर्माण होईल.सध्या छञपती संभाजी महाराज यांनी आरक्षण बाबतीत घेतलेली भुमिका कौस्तुकास्पद आहे. मराठासह उर्वरीत आरक्षण पासुन वंचित जातीना आरक्षण द्या माञ ते पन्नास टक्के पुढे जावु नये याची  दक्षता घेणे गरजेचे आहे. यावेळी अँड. कोमलताई सांळुक,े अभिजीत ढोबळे, रमेश गालफाडे उपस्थितीत होते.

 
Top