तेर / प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजनेतंर्गंत अनुसूचित जमातीच्या  लाभार्थ्यांना  अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले . 

30 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 93 पारधी समाजाच्या पात्र  लाभार्थ्यांना  जिवनावश्यक वस्तूचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जीद मनीयार,  प्रभाकर शिंपले , सुभाष कुलकर्णी  शासकीय माध्य.आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ए .एम . चौगुले आदि मान्यवरांच्या उपस्थिती  वाटप करण्यात आले.  

या अन्नधान्य कीटमध्ये साखर , हरभरा डाळ , तेल  ,  चहापावडर , तेल , तिखट , मीठ आदी  जिवनावश्यक साहित्याचा समावेश आहे.यावेळी आश्रम शाळेचे कार्यालयीन   अधिक्षक पी.व्ही केंद्रे, शिक्षक डी.टी.दिवाणे,.शेगर , आप्पा काळे , रामा पवार , सोमनाथ पवार ,अनील पवार  आदीं उपस्थित होते.


 
Top