उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राम श्रीरंग तोरमकर (रा. गावसुद, ता. उस्मानाबाद) यांच्या शेतातील गोठ्यातून सहा पोती भुईमुग, २० पोती उडीद व एक टार्पोलीन असा माल २८ ते २९ जुलै दरम्यानच्या रात्री चोरीस गेला होता. तपासादरम्यान उस्मानाबाद ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुल्ला, लियाकत पठाण, जाधव यांनी प्राप्त माहितीच्या आधारे सुनिल रघु पवार, हरी किसन पवार यांना २९ जुलै रोजी ताब्यात घेऊन चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.


 
Top