उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तसेच चिखली येथील मेजर राजेंद्र सुरवसे यांची भाजप किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राजेंद्र सुरवसे यांनी रब्बी हंगामात एका हेक्टरमध्ये ७३.६ क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेतले आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात भरघोस उत्पन्न घेता येते हे त्यांनी सिद्ध केले. भाजप व भाजप किसान मोर्चाच्या शेतकरी संवाद अभियानांतर्गत जिल्हा भाजप कार्यालयात बैठकीत जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र सुरवसे यांची भाजप किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, रंगनाथ सोळंकी, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, तसेच भाजपाचे रामदास कोळगे, राजसिंहा राजेनिंबाळकर उपस्थित हाेते.


 
Top