तुळजापूर / प्रतिनिधी - 

पुण्याहून जळकोट मार्गे गुलबर्ग्याकडे जात असलेली मारुती कार  (क्र. MH 12 QM 3706)  ही   रात्री नऊ वाजेच्या सुमारास नळदुर्ग - जळकोट दरम्यान जळकोट पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरे पुलावर आली असता चालकास पुराच्या पाण्याचा अंदाज  न आल्याने कार चालकाने सदरील  पाण्यात घातली मात्र  पाण्याचा वेग वाढला   गेल्याने चाकातील हवेमुळे  कार  पाण्यावर तरंगती होऊन एका बाजूकडून उलट दिशेने सोलापूर कडे जाणाऱ्या रोडवरून तीस फूट खोल फुलात जाऊन कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवार दि.९रोजी राञी ९ वाजता घडली.या अपघातातातुन सुदैवाने कार चालकासह आठ जण मुत्युच्या जबड्यातुन बाहेर आले.

 या बाबत अधिक माहीती अशी की, येथे  संध्याकाळी सात वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सदर फुलास पूर आला होता.   सदर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोडच्या दोन्ही बाजूला थांबते सदर वाहतूक तब्बल अडीच ते तीन तास थांबली होती.  अखेर कारचालकाने पाण्यातुन कार नेण्याचा निर्णय घेतला. यावेळी  कार चालकास पाण्याचा अंदाज नाही आल्यामुळे पाण्यातूनच कार पलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न  केला मात्र कार  तात्काळ पाण्यावर तरंगते होऊन एका बाजूकडून उलट दिशेने सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवरून 30 फूट खोल पाण्यात जाऊन कोसळली.  तत्पूर्वी चालक बाबू शेख यांच्या चाणाक्षपणामुळे त्यांनी तात्काळ कारमधून उतरून पुलाच्या कठड्यावर  थोपण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही जबरदस्त पाण्याच्या प्रवाहामुळे गाडी सरकत होती. गाडीमध्ये चालकाची पत्नी व सहा मुली असे एकूण आठ जण होते. त्यामुळे शेख यांनी  हार नत मानता समयसूचकतेने तात्काळ सीट बेल्ट बाहेर खेचून बाजूला असलेल्या दगडी खुंटीला बांधले. त्यामुळे अवघ्या एक ते दोन मिनिटांचा वेळ भेटल्याने गाडी मधील आपली पत्नी व मुलींना बाहेर पडण्यास सांगितले. तसेच त्याच ठिकाणी रामदेव धाबाही आहे, तेथील लोकांनी व अन्य वाहन चालकांनी तात्काळ संबंधित महिलेसह व मुलींना बाहेर काढण्यास मदत केली. सर्वजण बाहेर पडताच ज्या दगडी खुंटीला सीटबेल्टणे गाडी बांधली होती दुर्दैवानं ती खुंटीही तूटून पाण्यात वाहून गेल्याने गाडीही तात्काळ 30 फूट खोल पुलात कोसळली.  सदर कार मधील कुटुंब मुळ गुलबर्गा येथील रहिवासी असून व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या बकरी ईद सणासाठी सर्वांना कपडे खरेदी करून गुलबर्ग्याकडे निघाले होते. मात्र दुर्दैवाने वाटेतच दुर्घटणा घडली.

 मात्र म्हणतात ना, काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, या म्हणीप्रमाणे कोणालाही काहीही झाले नाही. सदर गाडी मध्ये चालक तथा कुटुंबप्रमुख बाबू मदारसाब शेख (  42  ) , पत्नी शकिरा बाबू शेख ( 37 ) ,  मुलगी सादिया (17 ), तबस्सूम (10) , बुशरा (12), आलीया (8), फातिमा (6)  तर अवघ्या दोन महिन्याची दिलशाद यांचा समावेश होता. सर्वजण अन्य वाहनाने रात्रीच गुलबर्गा येथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी बाबू शेख व अन्य नातेवाईक पुरुष मंडळी येऊन फुलवाडी येथील टोल नाक्या वरील आपत्कालीन पथकाने पुलातील गाडी काढण्यास मदत केली. सायंकाळी पाच वाजता गाडी बाहेर काढल्यानंतर नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार देण्यास गेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. नळदुर्ग ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार नवनाथ बांगर व अन्य सहकारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम करत होते.


 
Top