तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूरात मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थी पार्श्वभूमीवर मंदीर महाद्वारा समोर देविभक्तांची शहरातील श्री गणेश मंदीरात  दर्शनार्थ गर्दी झाली होती. यावेळी श्री गणेश भक्तांनी विघ्नर्हता गणरायाचे दर्शन घेऊन  विघ्ने दूर कर असे साकडे घातले. 


श्री तुळजाभवानीच्या वारादिवशी मंगळवारी आलेल्या अंगारका चतुर्थीस भाविक श्री गणेश मंदीरात जावुन आवर्जून विघ्नर्हता गणरायाचे दर्शन घेऊन  विघ्ने दूर कर असे साकडे भक्त घालतात.

शहरातील श्रीतुळजाभवानी मंदीरात असणाऱ्या उजव्या व डाव्या सोंडेच्या श्रीगणेश मुर्तीची मंदीर कर्मचाऱ्यांनी पुजाअर्चा केली तसेच ब्राम्हण गल्लीतील व्यास यांच्या वाड्यातील आडत असणाऱ्या श्रीगणेशाच्या दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती तसेच शुक्रवार पेठ मधील पावणारा गणपती , भवानी रोडवरील सुवर्णश्वर व उस्मानाबाद रस्त्यावर असणाऱ्या श्रीगणेश मंदीरात भाविकांची दिवसभर वर्दळ दिसुन आली. ज्यांनी अंगारकी चतुर्थीचा उपवास केला होता. अशा भक्तांनी राञी 9.45 वा. श्रीगणेशाची पुजाअर्चा करुन आरती करुन नैवद्य दाखवून प्रसाद प्राशन करुन उपवास सोडला.

 
Top