तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालय येथे शिव-अल्पसंख्याकसेनेच्या वतीने   इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच  २१ वृक्षांचे रोपन आसीम शेख या विद्यार्थ्यांच्या  हस्ते  करण्यात आले.

यावेळी शिव अल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख , चेतन बंडगर,  श्याम माळी, बालाजी पांचाळ,  जब्बार काझी, माजी सरपंच भागवत क्षिरसागर, ग्रामपंचायत सदस्य अजित क्षीरसागर ,ग्रामपंचायत सदस्य नागनाथ खोचरे, अभिजीत लोके ,माजी शिक्षक पाटील सर, भाऊ गुरुजी ,माजी शिक्षक दिगंबर इंगळे सर ,साहेबराव सरडे ,मुख्याध्यापक  देशमुख सर यांच्यासह सर्व शिक्षक-विद्यार्थी व गावातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मगर सर  यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर शेख यांनी मानले.

 
Top