तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं  औरंगाबाद विभागातील एक कोटी ते दहा कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या पतसंस्था गटातील प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार दि. 24 जुलै रोजी शिर्डी येथील आयोजित कार्यक्रमात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे  यांच्या हस्ते व नगर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष राजुदास जाधव यांच्या उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला

संस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे व्हा चेअरमन  श्रीकांत भोजने संचालक संतोष इंगळे संस्थेचे सचिव सज्जन जाधव शिवाजी गायकवाड सचिन शिंदे  यांनी हा पुरस्कार स्वीकारला  राज्यातील इतर पतसंस्थांना त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना  प्रेरणा मिळावी यासाठी पतसंस्थेच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पतसंस्था विभागवार दीपस्तंभ हा पुरस्कार राज्य फेडरेशनच्या कडून दरवर्षी दिला जातो समर्थ पतसंस्थेस सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त झाला असून पतसंस्थेने संस्थेच्या आजवर केलेल्या पारदर्शक कामकाजासाठी तसेच संस्थेने तुळजापूर तालुक्यात राबविलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन फेडरेशनच्या वतीनं संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाची साथ तसेच सभासदांचे सहकार्य यांच्यामुळेच हा पुरस्कार भेटल्याचे संस्थेचे चेअरमन नारायण नन्नवरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 
Top