तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर पाेलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने गुरुवारी मध्यरात्रीनंतर ३ वाजता वाहनाचा पाठलाग करून १५४ किलो गांजा पकडला.

तुळजापूर-बीड अशी अवैध गांजा वाहतूक होणार असल्याच्या गोपनीय खबरेवरून तुळजापूर पोलिस ठाण्याचे हवालदार सावरे यांनी तुळजापूर- उस्मानाबाद महामार्गावर लक्ष ठेवले. त्यांना एक संशयित वाहन उस्मानाबादच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. येरमाळा येथे त्यांनी ते वाहन थांबवून तपासणी केली असता चालक- गोपी लहु कांबळे (रा. तुळजापूर) व ममता भाऊसाहेब जाधव (रा. जालना) वाहनाच्या हौद्यातील आठ गाठोड्यांत पॉलिथीन पिशव्यांमध्ये गांजा या मादक वनस्पतीची वाळलेली पाने, फुले, बिया असा एकूण १५४ किलो गांजा अवैधपणे नेत असलेले आढळले. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top