उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विंश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून वारीवरील बंदी हटवण्याच्या मागणीसाठी व अन्य विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले व उस्मानाबाद  जिल्ह्याभरात प्रतिकात्मक स्वरूपात निदर्शने दि.१६ जून रोजी करण्यात आली.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, महाराष्ट्राची भूमी ही साधू-संतांची महान परंपरा लाभले ली पुण्यभूमी आहे. याच परंपरेतील वारी हा वारकरी संप्रदाय व वारकऱ्यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मुघलांच्या तसेच इंग्रजांच्या काळातही अबाधित होती परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे पायी वारीची परंपरा खंडित झाली.  स्वतंत्र भारतात किंवा अगदी पारतंत्र्यात देखील उपासने करिता कधी ही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही.

देशात सर्वत्र जन जीवन सामान्य होत असताना. हॉटेल्स, मॉल, दारुची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणाऱ्या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारकऱ्यांच्या उपासनेच्या या मुलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येत आहे? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे? कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने फक्त शिस्तप्रिय वारकऱ्यांवर का लादली जात आहेत असा सवाल यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने यावेळी करण्यात आला. तसेच लवकरात लवकर सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न

घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. या नंतरही साधूसंतांची, वारकऱ्याची होणारी अवहेलना न थांबल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संत समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल याची  गांभीर्याने नोंद घ्यावी असा सुचनावजा इशारा देण्यात आला.

या निवेदनावर विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, विंहिप जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय चवरे बजरंग दल जिल्हा संयोजक अॅड विक्रम साळुंके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

 
Top