उस्मानाबाद/प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विनापरवाना होत असलेल्या बायोडीझेलच्या विक्रीवर कार्यवाही करावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक / मालक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे की, केमिकलच्या नावाने गुजरात राज्यातून बायोडीझेलचे टँकर आणले जातात व उमरगा तालुक्यामध्ये कर्नाटक सीमेवर व तुळजापूर तालुक्यामध्ये विक्री चालू आहे. कलेक्टर ऑफिस ची परवानगी नसताना व काही पंप सिल केले असतानासुद्धा बायोडीझेलची विक्री चालू आहे. जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध बायोडीझेल विक्रीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. असेही यावेळी सांगण्यात आले. 

यावेळी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक / मालक असोसिशनचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, रविंद्र शेरखाने, अब्दुल रज्जाक अत्तार, प्रशांत कुदाळ, गिरीश हंबीरे, गोपाळ देशमुख, अभिजित मोहेकर, प्रतिक्षित खामकर, वैभव उंबरे, महादेव कांबळे, यांच्यासह सर्व डीलर उपस्थित होते.

 
Top