उस्मानाबाद/प्रतिनिधी

वीज बिलाअभावी बंद पडलेली तेरसह चार गावांची पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला वीज उपलब्ध करण्यासाठी तेरणा धरणाच्या बाजूलाच ८५ लाख रुपये खर्च करून सौर प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेत या योजनेसंदर्भात चर्चेसाठी घेतलेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता दशरथ देवकर, मजीप्राचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी वीजबिल भरण्याअभावी ठप्प पडलेली तेरसह चार गावांची पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचे बिल तब्बल एक कोटी ८६ लाख रुपये आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे बिल चारही ग्रामपंचायतींनी भरावे, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, येडशी, कसबेतडवळे व ढोकीतून काही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे जूनमध्ये या योजनेचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. आता यावर पर्याय म्हणून ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तातंरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शिखर समितीतही निर्णय होणार आहे.

Top