उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य  परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दि.08 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली होती.परंतु दि.08 ऑगस्ट रोजी काही जिल्हयात केंद्र शासनामार्फत सेन्ट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे परीक्षा दि.08 ऑगस्ट 2021 ऐवजी दि.09 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येणार आहे.या परीक्षेचे प्रवेशपत्र दि.27 जुलै 2021 रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे,असे जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.

 
Top