तुळजापूर / प्रतिनिधी

 युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण  मंत्री अदित्यजी ठाकरे  यांनी औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५२ व्हेंटिलेटर  देवू केले आहे. या व्हेंटिलेटर वाटप महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत  यांच्या हस्ते व प्रा.डॉ.गोविंद काळे  राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य  यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादचे  उपअधिष्ठाता डॉ.कैलास झिने, अधिक्षक डॉ.सुरेश हरबडे ,सुपर स्पेशालिटी विशेष कार्य अधिकारी डॉ.सुधिर चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी औरंगाबाद जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्रीमती रिता मैत्रेवार,निवासी उपजिल्हाधिकारी  संजीव जाधवर , अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाने   व  जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top