तुळजापूर / प्रतिनिधी- 

मागील १६  महिन्यात मागास आयोग गठीत न केल्याने ओबीसी समाजावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. याच्या निषेधार्थ व राज्य सरकारने ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा,या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या  वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सिमेवर असलेल्या तामलवाडी (ता तुळजापूर ) येथील टोल नाक्यावर शनिवार  दि.२६रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपाचे ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

प्रथमता  आंदोलनस्थळी छञपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर  चक्काजाम आंदोलन प्रारंभ करण्यात आला.सुमारे १ तास हे चक्कजाम आंदोलन करण्यात आल्याने तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर वाहतुक रोखली होती दोन्ही बाजूला शेकडो वाहनांचा रांगा लागल्या होत्या. 

 यात भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, पंचायत समिती उपसभापती शरद जमदाडे, जि.प.सदस्य राजकुमार पाटील,  विक्रम देशमुख, भिवा देशमुख, नारायण नन्नवरे, वसंत वडगावे, सुशांत भुमकर, आनंद कंदले , फिरोज मुजावर,  अण्णासाहेब लोढे, बापुसाहेब कणे, प्रभाकर मुळे, गणेश सोनटक्के,  दयानंद मुडके ,अण्णा सरडे, विजय शिंगाडे, दत्ता राजमान, सुहास सांळुके, गुलचंद व्यवाहारे, शिवाजी बोधले, हरिदास वट्टे, बाळासाहेब शामराज, उमेश गवते सह शेकडो भाजपा कार्यकते या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते.


 
Top