उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी राजकीय बचाव समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना दि. २५ जून रोजी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

ओबीसी बांधवांच्या तीव्र भावना त्यांच्या समोर मांडल्या आमचं हक्काच आरक्षण हिराऊन घेऊ नका,ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणुका लाऊ नका अशी विनंती केली.यावर जर तुम्ही काहीच निर्णय घेणार नसताल तर सबंध राज्यातील ओबीसी बांधव पेटुन उठल्या शिवाय राहणार नाही.आम्ही आत्ता पर्यंत शांतता पध्दतीने आंदोलने  केली. यापुढे आम्हाला कायदा व सुवस्था निर्माण होईल,अशी वेळ आणु नका,असे चर्चे दरम्यान सांगितले.

याप्रसंगी ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण माने,तेली समाजाचे प्रदेश युवक अध्यक्ष रवि कोरे आळणीकर,पत्रकार तथा ओबीसी आरक्षण समितीचे प्रसिध्दी प्रमुख संतोष हंबीरे, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी.एन कोळी, तेली समाजाचे उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे आदिंची उपस्थिती होती.


 
Top