लोहारा/प्रतिनिधी

 तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील मोघा (बु) व मोघा (खु) येथे दि.27 जुन 2021 रोजी शेतीशाळा प्रशिक्षक कार्यक्रम घेण्यात आला. 

मोघा (बु) येथे स्नेहल पाटील (शेतीशाळा प्रशिक्षक) यांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक सादर करुन सोयाबीन उगवण क्षमता तपासणी व  खरीप पेरणी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. व तसेच मोघा (खु) येथे  सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक अंकिता पाटील (शेतीशाळा प्रशिक्षक) यांनी सादर करुन सोयाबीन उगवण क्षमता तपासणी बाबतही मार्गदर्शन केले. दिपक लांडगे ( शेतीशाळा समन्वयक ) यांनी  निंबोळी अर्क तयार करणेबाबत माहिती दिली. ओम पाटील (कृषी सहाय्यक )  यांनी खरीप पेरणीनंतर करावयाची कामे याबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थितांचे आभार मानून शेतीशाळेचा समारोप करण्यात आला.

 
Top