परंडा / प्रतिनिधी  -

 परंडा तालुक्यातील इनगोदा ग्रा.प. चे उपसरपंच अभिमान गोकूळ औसरे यांची सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात. त्यांना निवडीचे पत्र दि.२५ रोजी सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते,सरपंच परिषदचे जिल्हा समन्वयक कंडारीचे सरपंच राहुल डोके, इनगोदाचे सरपंच हनुमंत जगताप, युवा नेते अमोल पाटील उपस्थित होते.औसरे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

 
Top