उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नरेद्र मोदी यांच्या 78 व्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण  27 जून 2021रोजी सकाळी 11 वाजता झाले .या ‘मन की बात”  कार्यक्रम प्रसारणाचे आयोजन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते.

याप्रसंगी, तुळजापूर विधानसभा आ .राणाजगजीतसिंह पाटील  ,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, यांनी या कार्यक्रमाचे प्रसारण  पाहिले.‘मन की बात” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील चालू घडामोडींचा आढावा घेतात तसेच भारत सरकार तर्फे राबवण्यात येणाऱ्या तसेच आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देतात . या कार्यक्रमामुळे सामान्य जनतेचे प्रश्न हे थेट आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोचवू शकतो आणि तसेच त्या समस्या मार्गी लावू शकतो. आतापर्यंत या कार्यक्रमामुळे अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत .

या कार्यक्रमात बोलत असताना नरेंद्र मोदी म्हणाले की अफवांवर विश्वास ठेवू नका ,कोरोना वरील लस सुरक्षित आहे आणि सर्वाना मोफत आहे, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे  असे आवाहन केले.    हा कार्यक्रम पाहण्यासाठी,कार्यक्रमस्थळी  प्र का स ऍड खंडेराव चौरे ,माजी नगराध्यक्ष सुनील काकडे ,भा ज यु मो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते .

 
Top