उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.09- जिल्हयातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका/ग्रामीण बँका/खाजगी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 31 मे 2021 पर्यंत जिल्हयात 14 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे, 60 टक्केपर्यंत वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.

  याबाबत जिल्हाधिकारी यांनी बँकनिहाय पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला. सर्व बँकांनी 30 जुन 2021 अखेर त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या 60 टक्के पीककर्ज वाटप करावे. पीककर्ज वाटप करतांना शासनाने सन 21-22 हंगामाकरीता पीकनिहाय कर्जदर निश्चित केल्याप्रमाणे कर्ज पुरवठा करावा. याकरीता बँकेतील कर्मचारी/क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांना नेमुन दिलेल्या गावामध्ये भेट देवुन जनजागृती करावी.तसेच शेतक-यांना पीक कर्जाशिवाय दुग्धव्यवसाय/कुक्क्‌ट पालन/शेळीपालन इत्यादीसाठीही कर्ज पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले.

 तरी जिल्हयातील सर्व शेतक-यांनी खरीप हंगाम 2021-22 मध्ये पीककर्ज मिळण्याकरिता  बँकेशी संपर्क करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


 
Top