उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नाफेडतर्फे किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने चणा खरेदीसाठी 18 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. चणा खरेदी 25 जानेवारी-2021 पासून सुरु करण्यात आली होती. खरेदीची अंतीम मुदत 25 मे 2021 पर्यंत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी दिली.

 कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मार्च 2021 मध्ये लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे काही शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत योजनेचा लाभ मिळवता आलेला नाही.अशा शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी व हमीभावाचा लाभ मिळावा,यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा कालावधी 18 जून 2021 पर्यंत वाढवून दिला आहे.शेतकऱ्यांनी कार्यकक्षेतील खरेदी केंद्रावर नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.


 
Top