उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राज्यातील महा विकास बिघाडी सरकारने ओबीसी आरक्षण संदर्भात निष्क्रिय भूमिका घेतल्याने ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने गदा आणली असल्याने याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्हा ओबीसी मोर्चा च्या वतीने  दिनांक 3 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी सांगितले आहे. 

यासंदर्भात भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे प्रमुख कार्यकर्त्यांची ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्ह्याचे प्रभारी देविदास काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यावेळी प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, माजी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पांडुरंग लाटे,  महेंद्र बिडकर, साहेबराव घुगे, आदी उपस्थित होते.

राज्यातील महा विकास बिघाडी सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आयोग न नेमता बाजूच मांडली नसल्याने बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसी वर्गावर मोठा अन्याय झाला आहे. याला वाचा फोडण्यासाठी दिनांक 3 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आक्रोश आंदोलन करणार  असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी या बैठकीस भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रमोद बचाटे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोंधर, नंदकुमार माळी, सतीश वैद्य, सावता माळी, संतोष शिरसागर, बालाजी चव्हाण, मनोज पवार, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीचे सूत्रसंचालन महेंद्र बिदरकर व आभार प्रदर्शन प्रमोद बचाटे यांनी केले. दिनांक 3 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन धडकणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी केले आहे.


 
Top