कळंब / प्रतिनिधी-

राज्यातील ७०%टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. सततची नापिकी, दुष्काळ आणि अवर्षणामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे आणि या शेतीवर मोलमजुरी करून उपजीविका करणारे भूमिहीन लाखो शेती कामगारांना रोजगार मिळत नसल्यामुळे काही अर्धपोटी तर काही उपासपोटी राहत आहेत.

 शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पेन्शन सन्मान योजना सुरु केली त्याच धर्तीवर राज्य सरकारने भूमिहीन शेत मजुरांसाठी व विविध क्षेत्रातील मजुरांसाठी पेन्शन सन्मान योजना सुरू करावी आणि कोरीना महामारीच्या लॉकडाऊन काळात या मजुरांना आधार म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे यांनी ३१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळंब तहसील मार्फत दिले आहे.

 या निवेदनावर प्रबुद्ध रंगभूमी बहु उद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,समता सामाजिक संस्थेचे सदस्य भागवत त्रिमुखे,अमित भंडारे,तुषार शिंदे,सुमित ताटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top