उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री मा.डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने आज जिल्हयात ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरची बँक सुरु करण्यात आली. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणविस यांच्या माध्यमतून ३५ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर  उस्मानाबाद  जिल्ह्यासाठी उपलब्ध केले आहे.

 या ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर बँकेचे लोकार्पण आज मा.डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. हे ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर भारतीय जनता पार्टी, प्रतिष्ठान भवन येथे उपलब्ध असतील यामुळे ऑक्सीजन अभावी होणारी रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. कोरोना आजारातुन बरे झालेले व घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सीजनची गरज असल्यास त्यांना ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध असतील. यासाठी प्रतिष्ठान भवन येथे नोंदणी करुन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध होतील. या ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर साठी श्री.प्रभाकर मुळे (मो.९४०५५१२९४२), प्रा.डॉ.प्रशांत कोल्हे(मो.९८९०६६८९४९), प्रा.डॉ.डी.बी.मोरे(मो.९४२३३४००९२)  यांच्याशी संपर्क करावा.

 या कार्यक्रमासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धीजिवी प्रकोष्ठचे प्रदेश सहसंयोजक श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, प्रदिप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,‍ विनोद गंगणे, परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विजय आबा कंदले, बापुसाहेब कणे, देवा नायकल, अशिष नायकल, संदिप साळुंके,  डॉ. चंद्रजीत जाधव, अभिजित काकडे, देवकन्या गाडे, गुणवंतराव देशमुख, निहाल काजी, अजित मेटे विशाल पाटील, सुरज शेरकर, महेश चांदणे, प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते.


 
Top